चक्क पोलिसाचीच दुचाकी चोरट्याने केली लंपास
सांगली : खरा पंचनामा
सांगली-मिरज रस्त्यावरील पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानच्या पिछाडीस उभी केलेली एका पोलिस अंमलदारांचीच दुचाकी चोरट्याने लंपास केली. शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी चार यावेळीत ही चोरी झाली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. चक्क पोलिसाचीच गाडी चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
माळी यांनी शनिवारी शहीद अशोक कामटे चौकाच्या कोपऱ्यात त्यांची गाडी उभी केली होती, असे फिर्यादीत नमुद आहे. माळी यांनी त्याची दुचाकी लॉक करून ठेवली होती. भर दिवसा चोरट्यांनी त्या गाडीचे लॉक तोडून चोरी केली. याची कानोकान खबर पोलिसांना लागली नाही. यावरून पोलिसांच्या दक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होतोय. अधीक्षक यांच्या बंगल्याच्या परिसरात अनेक अंमलदार सुरक्षेसाठी असतात. अशा परिस्थितीत चोरट्यांनी हे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.