Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपवर कमळाविरोधात प्रचाराची वेळ,अधिकृत उमेदवार अपक्ष लढणार

भाजपवर कमळाविरोधात प्रचाराची वेळ,अधिकृत उमेदवार अपक्ष लढणार

उल्हासनगर : खरा पंचनामा

उल्हासनगरमध्ये भाजपनं एका जागेवर दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचा प्रकार समोर आला. यामुळे निवड प्रक्रिया आता वादात अडकण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक १९ ब मध्ये पक्षाचा एबी फॉर्म शहर भाजप मंडल अध्यक्षांच्या पत्नीलाच दिला होता.

तर स्थानिक नेत्यांकडून सध्या अपक्ष असलेल्या कोमल लहरानी यांना दिला गेला. आता यावरून पक्षातच वादाला सुरुवात झालीय. स्थानिकांनी बॅटबॉल चिन्हावर लढणाऱ्या अपक्ष उमेदवार कोमल लहरानी या भाजपच्या अधिकृत उमेदवार असल्याचं स्पष्ट केलंय. तर कमळ चिन्हावर लढणाऱ्या लक्ष्मी कुर्सिजा या बंडखोर असल्याचं सांगितलंय.

प्रभाग क्रमांक १९ मध्ये ब वॉर्डात भाजपने बंटी कुर्सिजा यांची पत्नी लक्ष्मी कुर्सिजा आणि कोमल लहरानी यांना एबी फॉर्म दिले होते. एकाच जागेवर दोन फॉर्म देण्यात आले. यात कुर्सिजा यांनी लहरानी यांच्या अगोदर अर्ज दाखल केल्यानं तो अधिकृत ठरला. तर भाजपकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारांच्या यादीत लक्ष्मी कुर्सिजा यांच्या ऐवजी लहरानी यांच्या नावाचा समावेश आहे.

प्रभागातील इतर तीन भाजपच्या उमेदवारांनीही अधिकृत उमेदवाराऐवजी कोमल लहरानी यांना पाठिंबा जाहीर केलाय. जिल्ह्याच्या नेत्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय. बंटी कुर्सिजा यांना चुकून एबी फॉर्म दिला असल्याचंही जिल्हाध्यक्षांनी कबूल केलंय. दरम्यान, बंटी कुर्सिजा यांची मंडल अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलीय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.