बिनविरोध निवडणूक : मनसेची हाय कोर्टात धाव
मुंबई : खरा पंचनामा
महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे बिनविरोध उमेदवार अनेक महापालिकांमध्ये निवडून आले आहेत. 65 पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध नगरसेवक झाले आहेत.
मात्र, या बिनविरोध निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावून फॉर्म मागे घेण्यास भाग पाडले, तर काही ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांशी सेटींग केल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे.
बिनविरोध निवडणूक आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करावी किंवा त्यांच्या निवडीला स्थगिती द्यावी यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव हे मुंबई हायकोर्टात आज याचिका केली आहे. त्यामुळे बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचा फैसला कोर्टात होणार आहे. आत्तापर्यंत बिनविरोध उमेदवारांच्या निवडणुकी विरोधात तीन याचिका कोर्टात दाखल झाली आहे.
अविनाश जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले. बिनविरोध निवडणूकीच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांना धमकावले, स्थानिक निवडणूक कर्मचाऱ्यांनी देखील विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर अन्याय करत त्यांचे फॉर्म मुद्दामून बाद केल्याची तक्रार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली तसेच पुरावे देखील त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले.
राज ठाकरे यांनी देखील बिनविरोध उमेदवारांच्या मुद्यावर भाजपला सुनावले आहे. ते म्हणाले, जेव्हा बंगालमध्ये ममता बॅनर्जीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तेव्हा भाजप कोर्टात गेला होता. ममता बॅनर्जीचा पक्ष उमेदवारांवर धमकावल्याचा आरोप लावत निवडीला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली होती. आता त्यांनी ही बिनविरोध निवड चालते का असा सवाल त्यांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.