Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करणार ३ सदस्यांचे पथक

अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करणार ३ सदस्यांचे पथक

दिल्ली : खरा पंचनामा

बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चौघांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताच्या चौकशीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

मंत्रालयाने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये सांगितले आहे की, एएआयबी पथकाबरोबरच, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे एक तीन सदस्यांचे पथक अपघाताच्या दिवशी दुर्घटना स्थळावर दाखल झाले होते. एएआयबीचे डायरेक्टर जनरल यांनी देखील लिअरजेट ४५ विमान कोसळले त्या ठिकाणाला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला.

"तपास वेगाने सुरू असून अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हा ताब्यात घेण्यात आला आहे," असे मंत्रालयाने एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, “एक सखोल, पारदर्शक आणि निश्चित वेळेत पूर्ण होणारी चौकशी केली जाईल याची काळजी घेणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे," असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर, ज्याला एकत्रितपणे ब्लॅक बॉक्स म्हणतात, हे ताब्यात घेण्यात आले आहे आणि याच्या माध्यमातून विमानाच्या शेवटच्या क्षणांमध्ये नेमकं काय झालं? याबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्याचे विश्लेषण केले जाईल.

तसेच मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एएआयबी नियम, २०२५ च्या नियम ५ आणि ११ नुसार तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच ही चौकशी कठोर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.