'एमआयएम'ची नगरसेविका सहर शेख अडचणीत
जिंकल्यानंतर आठच दिवसांतच पोलिसांची नोटीस
ठाणे : खरा पंचनामा
राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. यात सर्वात जास्त चर्चा मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधील निकालाची होत आहे. याठिकाणी एमआयएमच्या तिकीटावर निवडणूक लढवत जिंकलेल्या नगरसेविका सहर शेख या सध्या सोशल मीडियावर मोठ्या वादात सापडल्या आहेत. त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ठाणे महानगरपालिकेत मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्यानंतर एमआयएमच्या तरुण महिला नगरसेविका सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता कैसा हराया? असं म्हणत डिवचलं होतं. तसेच त्यांनी पुढच्या पाच वर्षांनी संपूर्ण मुंब्रा हिरवं करुन टाकण्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती.
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षस्थापनेपासून मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष राहिलेल्या युनूस शेख यांनी आपली मुलगी सहर शेखसाठी उमेदवारा मागितली होती. पण जितेंद्र आव्हाडांशी उडालेल्या खटक्यानंतर त्यांच्या मुलीसाठीची उमेदवारी नाकारण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानंतर युनुस शेख यांच्या मुलीनं अर्थात सहर शेखनं एमआयएमकडून निवडणूक लढली आणि ती जिंकलीही. याच विजयी सभेत बोलताना सहर शेख यांनी विरोधकांसह राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनाही ललकारलं होतं.
याचसभेत सहर शेख यांनी मुंब्याला हिरवं करणार असल्याबाबत गंभीर विधान केलं होत. त्यांच्या याच विधानावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मुंब्रा पोलिसांनी या विधानाची गंभीर दखल घेतानाच सहर शेख आणि त्यांचे वडील युनिश शेख यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीत पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांना समाजात असंतोष निर्माण होईल, असं भाषण न करण्याबाबत तंबी दिली आहे.
मुंब्रा पोलिसांनी निवडणूक निकालानंतर आठच दिवसांतच एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्यासह त्यांचे वडील युनुस शेख यांना नोटिस धाडली आहे. या नोटिशीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार सोशल मीडियावर सामाजिक सलोखा धोक्यात येईल असे विधानं टाळा अशा पोलिसांनी कडक सूचना दिल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.