तत्कालीन युती सरकारने भ्रष्टाचाराचा पाया घातला, अजित पवारांनी कळस गाठला!
नाशिक : खरा पंचनामा
शंभर कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा भाजपवर आरोप करून अजितदादाच फसले; त्या वेळच्या अधिकाऱ्याने अजितदादांच्या भ्रष्टाचारी कळसाचे किस्से बाहेर आणले. 1999 मध्ये त्यावेळच्या शिवसेना-भाजप युती सरकारने पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पाची रक्कम ३१० कोटी रुपये दाखविली होती.
ती 100 ते 150 कोटी रुपयांनी वाढविल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना भाजप युती सरकारवर केला होता. तो भ्रष्टाचार आपण वेळीच रोखला. कारण त्यापैकी 100 कोटी रुपये पार्टी फंडाला जाणार होते. हा निर्णय शिवसेना - भाजप युती सरकारच्या काळातला होता. त्या वेळच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या 10 कोटी रुपयांची भर घालून प्रकल्पाची रक्कम जास्त वाढविली होती. आपण ती फाईल वेळीच रोखली. त्यामुळे त्यांचा भ्रष्टाचार बाहेर आला नाही. ती फाईल रोखली नसती, तर तेव्हाच हाहाकार माजला असता, असा दावा अजित पवारांनी पत्रकार परिषदेत केला होता.
खुद्द अजित पवार यांवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असताना अजित पवारांनी भाजपच्या तत्कालीन नेत्यांवर 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. महापालिका निवडणुकांचा प्रचार संपताना अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली.
पण भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करून स्वतः अजित पवारच फसले. कारण जलसंपदा विभागातले त्यावेळचे वरिष्ठ अधिकारी विजय पांढरे यांनी अजितदादांच्याच भ्रष्टाचाराची पोलखोल केली.
अजित पवार यांनी केलेले आरोप 100% खरे आहेत. पण त्यांनी स्वतःच्याच खात्यातल्या भ्रष्टाचार बाहेर काढलाय. अजितदादांनी फक्त 100 कोटी रुपयांची माहिती सांगितली आहे. प्रत्यक्ष तो हजारो कोटींचा भ्रष्टाचार आहे. अजित पवारांनी जरी भ्रष्टाचाराचा आरोप केला असला, तरी प्रत्यक्षात स्वतःच अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला. इतरांनी छोटे-मोठे भ्रष्टाचार केले, पण अजित पवारांनी त्या भ्रष्टाचाराचा कळस गाठला.
सिंचन घोटाळ्यातल्या भ्रष्टाचारासंदर्भात मी अनेकदा सरकारला पत्र लिहिले. पण सरकारने प्रतिसाद दिला नाही. विरोधक आणि सत्ताधारी दोघेही चोर आहेत. अजितदादांना आपल्या शेजारी बसवून भाजप फसला. अजितदादांना भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे, पण त्यांनी स्वतःच भ्रष्टाचाराचा कळस गाठला.
जलसंपदा खात्यातले अधिकारी मंत्र्यांना स्कीम देतात. ही स्कीम राबवली, तर आपण हजारो कोटी रुपये कमवू शकतो, असे ते मंत्र्यांना सांगतात यातून भ्रष्टाचार सुरू होतो. अजित पवारांनी तीच मोडस ऑपरेंडी वापरून सिंचनात भ्रष्टाचाराचा कळस गाठला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.