साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णीवर हल्ला, तोंडाला काळे फासले
सातारा : खरा पंचनामा
साहित्य संमेलनाला पुन्हा एकदा वादाचे गालबोट लागलेय. साताऱ्यात विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना काळे फासण्यात आलेय. या घटनेनंतर साताऱ्यात अन् महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर विनोद कुलकर्णी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास करावा, माझे प्राण गेले तरी मला पर्वा नाही, असे कुलकर्णी म्हणाले.
मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर साताऱ्यात हल्ला करण्यात आला. त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आलेय. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. साहित्य संमेलनाच्या स्थळीच हल्ला झालाय. हल्लेखोरांनी काळा बुक्का टाकला. विनोद कुलकर्णी यांच्या चेहऱ्याला काळे फासण्यात आले. हल्ला करणारे हल्लेखोर कोण होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना स्वाभिमानी संघटनेने काळे फासल्याचे बोलले जात आहे.
माझ्यावर हल्ला का झाला? याबाबत मला कोणताही माहिती नाही. माझा प्राण गेला तरी मला पर्वा नाही. पण मी माझे काम थांबवणार नाही. पोलिसांनी आरोपींना शोधावे, अशी प्रतिक्रिया विनोद कुलकर्णी यांनी दिली. साताऱ्यात ते बोलत होते. विनोद कुलकर्णी यांच्यावर साहित्य संमेलनाच्या स्थळीच हल्ला झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामधील कारण काय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.