नूतन पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राचे नवनियुक्त पोलीस महासंचालक यांनी आज मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाते यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच राज्याच्या पोलीस दलाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारताना त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
भेटीदरम्यान राज्यातील कायदा व सुव्यवस्था, पोलीस प्रशासनासमोरील आव्हाने आणि नागरिक-केंद्रित पोलिसिंग या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. नव्या जबाबदारीत राज्यातील अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी पोलीस दलाकडून अपेक्षित असलेल्या कामकाजावरही या भेटीत विचारविनिमय झाला.
नवनियुक्त पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांच्या कार्यकाळाकडे प्रशासनासह जनतेचेही लक्ष लागले असून, या भेटीमुळे त्यांच्या पुढील कामकाजाला औपचारिक सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.