Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

नवी दिल्ली : खरा पंचनामा

देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात, दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वोत्कृष्ट चित्ररथ' म्हणून प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा डंका देशभर वाजवला आहे.

केंद्र सरकारकडून याचा निकाल देण्यात आला. महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावून इतिहास रचला आहे. जम्मू काश्मीर ने दुसरे व केरळच्या चित्ररथाने तिसरे क्रमांक पटकावले आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राकडून गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनाच्या चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले होते. याच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, गणेशोत्सवाचा वारसा, आर्थिक रोजगार व आत्मनिर्भरतेच संदेश दिला होता.

चित्ररथावर गणपतीची भव्यमूर्ती, पारंपारिक लेझीम ढोल ताशा पथकचे कलाकार देखील होते. या कलाकारांच्या उत्साहवर्धक सादरीकरणाने कर्तव्यपथ प्रभावी झाला. या प्रभावी सादरीकरणामुळे महाराष्ट्राच्या या चित्ररथाला प्रथम क्रमांक देण्यात आले. आणि या चित्ररथाची सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवड करण्यात आली.

संस्कृती मंत्रालयाच्या चित्ररथाने यंदा 'वंदे मातरम्' गीताच्या '150 वर्षांच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधले होते, ज्यामध्ये 1928 मधील 'वंदे मातरम्'चे एक दुर्मीळ ध्वनिमुद्रण सादर करण्यात आले. या चित्ररथातून जुन्या परंपरा आणि 'जेन-झी' तरुण पिढीचा संगम दाखवण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.