'नगरसेवक बायको नामधारी अन् पतीच झाला कारभारी'
पुणे : खरा पंचनामा
महापालिका निवडणुकीच्या निकालाला आठवडा उजाडण्यापूर्वीच नगरसेविकांच्या आधी त्यांच्या पतींनीच कारभार हातात घेण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या खराडी-वाघोली भागातील एका नगरसेविकेच्या पतीने स्वच्छतेसंदर्भातील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची स्वतःच शाळा घेतली. त्यामुळे 'नगरसेवक बायको नामधारी अन् पतीच झाला कारभारी' असे चित्र पाहायला मिळाले.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक 87 महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यात आता पुण्याची महापौर आता महिला होणार आहे. महिलांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळावी, या उदात्त हेतूने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा हेतू यानिमित्ताने साध्य होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही पुरुषी मानसिकता कायम आहे, याचा प्रत्यय महापालिका निवडणुकीनंतर आठ दिवसांच्या आत येण्यास सुरुवात झाली.
वाघोलीत महापालिका कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर या नगरसेविकेने स्वच्छतेचा आढावा घेतला. मात्र, संपूर्ण बैठकीत नगरसेविका गप्प होत्या. पती महोदयांनीच सर्व आढावा घेत स्वच्छतेवरून अधिकाऱ्यांची शाळा घेतली. सोशल मीडियावर या बैठकीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या महिलांना स्वतंत्र काम करण्याची संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.