Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता मशालीची धग...! बाळासाहेबांचं जुनं व्यंगचित्र शेअर करत शिवसेनेनं भाजपला डिवचलं

आता मशालीची धग...! 
बाळासाहेबांचं जुनं व्यंगचित्र शेअर करत शिवसेनेनं भाजपला डिवचलं

मुंबई : खरा पंचनामा

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 100 वी जयंती. यानिमित्त त्यांच्या आठवणींना विविध उपक्रमांद्वारे उजाळा दिला जात आहे. दोन्ही शिवसेनांकडून मुंबईत त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांचे विचार आणि राजकीय कारकीर्दीबाबत चर्चाही सुरु आहेत. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंचं एक जुनं व्यंगचित्र शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बाळासाहेब ठाकरे याचं एक जुनं व्यंगचित्र शेअर केलं आहे. यावरुन त्यांनी भाजपला डिवचलं असून भाजपच्या सध्या राजकारणावरुन आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे व्यंगचित्र शेअर करताना चित्रे यांनी म्हटलं की, "उन्मत्त भाजपाला आरसा दाखवणारं वंदनीय बाळासाहेबांच एक जुनं व्यंगचित्रं... आता मशालीची धग सहन करा!"

बाळासाहेब ठाकरेंनी साकारलेल्या या व्यंगचित्रात दोन कार्टुन्स आहेत. एकामध्ये शिवसेनेच्या हातात कमळाचं फुल आहे. त्याच चित्रात भाजपरुपी काळी टोपी घातलेला एक माणूस आहे. त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. या चित्राला त्यांनी कॅप्शन देताना 'कमळ धरले त्यावेळी सुखावलात' असं म्हटलं आहे. तसंच दुसरं एक चित्र आहे यामध्ये शिवसेनेच्या हातात मशाल आहे. या मशालीच्या आगीची धग भाजपला लागत असल्याचं यामध्ये दाखवलं आहे. यातही भाजपरुपी एक माणूस असून तो घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. याला कॅप्शन देताना म्हटलं की, "आता मशालीची धग सहन करा"

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.