Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'युती तोडा, युती तोडा' कार्यकर्त्यांनी अडवली भाजप मंत्र्याची गाडी, जोरदार घोषणाबाजी

'युती तोडा, युती तोडा' 
कार्यकर्त्यांनी अडवली भाजप मंत्र्याची गाडी, जोरदार घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये स्बळावर लढण्यानंतर भाजप आता सत्ता स्थापन करणार आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून जागावाटपावर रस्सीखेच झाली.

पण अखेरीस एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे मंत्री अतुल सावेंनी युतीची घोषणा केली. पण, संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी युती तोडा, युती तोडा अशी घोषणाबाजी करत सावेंची गाडी अडवली. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची बैठक अखेरीस पार पडली. दिवसभरापासून जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेरीस संध्याकाळी जागावाटपाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा केली आहे.

इकडे अतुल सावे यांनी घोषणा केल्यानंतर आपल्या वाहनाकडे चालले होते. त्यांच्यापाठोपाठ भाजपच्या कार्यकर्त्यांनी युती तोडा युती तोडा, अशी घोषणाबाजी करत घेराव घातला. वैजापूर तालुक्यातील भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे थेट मंत्री अतुल सावे आणि भाजपचे आमदार खासदार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच गाडी अडवली. त्यामुळे काही काळ राडा आणि गोंधळ झाला होता. वैजापूर तालुक्यातील आठ जागांपैकी केवळ तीन जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.

"अनेक वर्ष आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो. मात्र ती जागा शिवसेनेला केली आहे आणि तेही भाजपच्या नेत्यांना शिव्या देणाऱ्या व्यक्ती उमेदवार असणार आहे. त्यामुळं आता आम्ही त्यांच्यासाठी करायचं का? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.