Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चोरीचा मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादीनी मानले विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे आभार!मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आयोजन

चोरीचा मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादीनी मानले विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे आभार!
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आयोजन

सांगली : खरा पंचनामा

कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याहस्ते चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादीना परत देण्यात आला. मुद्देमाल परत मिळाल्याने भावुक झालेल्या फिर्यादीनी महानिरीक्षक फुलारी यांचे आभार मानले.

सांगली जिल्हयाचे वार्षीक परीक्षण करीता महानिरीक्षक फुलारी आज मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच मिरज शहर पोलीस ठाणे येथे उपस्थित होते. या वार्षीक परीक्षण दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याला त्यांनी अचानक भेट दिली. यावेळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील शेतक-याचे ट्रॅक्टर ब्लोअर चोरी करणारी टोळी जेरंबद करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्हयातील चोरीस गेलेले 11 लाखांचे ट्रॅक्टर ब्लोअर जप्त करण्यात आले होते. 

या गुन्हयातील मुद्देमाल फिर्यादी यांना बोलावुन घेवुन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक अजित सिद याचे हस्ते फिर्यादी यांना ट्रॅक्टर ब्लोअर त्याचे ताब्यात देण्यात आले. यावेळी फिर्यादीनी मिरज ग्रामीण पोलीसांनी ट्रॅक्टर ब्लोअर चोरी करणारे आरोपीना अटक करुन चोरीस गेले ट्रॅक्टर ब्लोअर शोधुन परत मिळवुन दिल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त करुन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे व पोलीस विभागाचे आभार मानले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.