Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू-मुस्लीम वाद न पेटवल्याची निवडणूक दाखवा आणि ११ लाख घेऊन जा"

"देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू-मुस्लीम वाद न पेटवल्याची निवडणूक दाखवा आणि ११ लाख घेऊन जा"

मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मुंबईत आज शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक संयुक्त सभा होणार आहे.

शिवशक्तीच्या या जागरामुळे सर्वांचे लक्ष शिवाजी पार्ककडे लागले आहे. तर दुसरीकडे, महायुती आज मुंबईसाठीचा वचननामा प्रसिद्ध करणार आहे. दरम्यान संजय राऊत यांनी बदलापूर प्रकरणावरुन भाजपावर टीका केली आहे.

भाजपाला असं वाटतं की जनता मूर्ख आहे, त्यांनी केलेल्या सगळ्या पाप कर्मांना जनता मान्यता देईल. हम करे सो कायदा मान्य केला जाईल. माघार घेण्याची ही तिसरी वेळ आहे. आरोपीला पद देण्याचे धाडस यांच्यात कुठून येते म्हणत संजय राऊत यांनी म्हटले की, भाजपाने तिसऱ्यांदा अशाप्रकारची माघार घेतली आहे. एमआयएमसह युती केली तेव्हा मुख्यमंत्र्यांना युती आमची नाही हे सांगावं लागलं. काँग्रेससह युती केली तेव्हाही फडणवीसांना हेच सांगावं लागलं की हे मान्य नाही. तरीही बिनधास्तपणे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी आपटेला स्वीकृत सदस्य केलं. इतकं धाडस या लोकांमध्ये येतं कुठून? मी यावर आता संशोधन करणार आहे असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राज्यात सर्वात मोठी संतापाची लाट उसळली होती. त्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या व्यक्तीला तुम्ही स्वीकृत सदस्य करता? तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यानंतर ते पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशात बलात्काराचा आरोपी जसा सोडून दिला तसंच चित्र महाराष्ट्रात दिसतं आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. हे जे काही घडतं आहे त्याचं कारण फडणवीसांचे लोक मोकाट सुटले आहेत. आमचा बॉस वर्षा बंगल्यावर आहे तो आम्हाला पाठिशी घालेल या आत्मविश्वासातून या गोष्टी घडत आहेत.

उद्धव ठाकरे विकासकामांवर बोलल्याचं दाखवा माझ्याकडून दोन किंवा तीन हजार रुपये घेऊ जा अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं की हिंदू मुस्लिम जातीयवाद हे प्रश्न न आणता देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवलेली दाखवा माझ्याकडून १ लाख रुपये घेऊन जा. त्यावर विचारलं असता राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे जे म्हणाले ते योग्य आहे, त्यांचे १ लाख आणि माझ्याकडून १० लाख असे ११ लाख रुपये घेऊन जा. देवेंद्र फडणवीस महापालिकेच्या निवडणुकीत जय श्रीराम, हिंदू मुस्लिम वगैरे आणत आहेत. त्यामुळे त्यांनी अशी एकही निवडणूक लढवलेली नाही ज्यात हिंदू मुस्लिम, जातीयवाद किंवा इतर असेच मुद्दे आणलेले नाहीत. तसं असेल तर दाखवा आणि ११ लाख घेऊन जा असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.