कसबे डिग्रज येथील महावीर स्टेट अकॅडमीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सांगली : खरा पंचनामा
कसबे डिग्रज येथील महावीर स्टेट अकॅडमी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील, संस्थेचे सदस्य नितीनकुमार चौगुले, अजित फराटे व सुदर्शन शिरोटे, तसेच माजी सैनिक सुरेश जाधव व ज्ञानेश्वर वाकरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कॉलेजचे प्राचार्य किरण वाडकर, शाळेचे प्राचार्य संजय मस्कले, उपप्राचार्या जयश्री पाटील तसेच समन्वयक वंदना शिरोटे उपस्थित होत्या.
माजी सैनिक ज्ञानेश्वर वाकरेकर आणि माजी सैनिक सुरेश जाधव तसेच संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगताना प्रमुख पाहुणे सुरेश जाधव यांनी भारतीय संविधान, राष्ट्रप्रेम, देशसेवा व शिस्त याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना NDA (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) विषयी सविस्तर माहिती देताना NDA परीक्षेची तयारी, पात्रता, संधी तसेच सैन्यातील करिअर याबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी संविधान पालनाचा संकल्प घेतला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.