Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"एखादं नाव घ्यायचं राहिलं तर गोंधळ का घालायचा?"

"एखादं नाव घ्यायचं राहिलं तर गोंधळ का घालायचा?"

नाशिक : खरा पंचनामा

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस परेड मैदान येथे शासकीय ध्वजवंदन सोहळा झाला. मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली.

मंत्री महाजन यांच्या भाषणावेळी एक वेगळाच प्रकार घडला. मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करीत एक महिला कर्मचारी संतप्त झाली. या महिला कर्मचाऱ्याने महाजन यांना जाब विचारला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. गिरीश महाजन यांना जाब विचारणारी महिला कर्मचारी वन विभागात कार्यरत असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणावरून गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "एखादं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर एवढा गोंधळ कशासाठी घालायचा? मी जाणीवूपर्वक अर्वाच्च किंवा उलटं सुलटं बोललो नव्हतो. पण नाव राहिलं म्हणून एवढा गोंधळ घालायची गरज नव्हती. नाव राहिलं म्हणून मी तत्काळ दिलगिरी व्यक्त केली. पण मी खरंच सामाजिक समरसता जोपासणारा माणूस, मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. त्यांचा विचार जोपासणारा माणूस आहे. मला वाटतं यावर हा विषय थांबवाल पाहिजे होता. पण अॅट्रोसिटी दाखल करा असं म्हणणं चुकीचं आहे."

मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन कार्यक्रमावेळी भाषण केले. गेल्या काही वर्षांतील आव्हानात्मक काळातून विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे मंजूर झाले आहेत. कुंभमेळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणामार्फत सर्व विभाग समन्वयाने कामे प्रगतीपथावर आहेत. नाशिकमध्ये 'रामकाल पथ' विकसित करण्यात येत असून, यामुळे नाशिक जागतिक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ६५ किलोमीटरचा बाह्य वळण रस्ता (रिंग रोड) प्रस्तावित असल्याचे महाजन यांनी सांगितले. महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विकास कामांची माहिती दिली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही, त्यामुळे वाद निर्माण झाला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.