गुन्हा दाखल नसताना तडीपार कसे केले?
ठाकरेंचा खासदार पोलिसांना नडला
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई महापालिकेसाठी आज मतदान होत असताना मध्यरात्री मोठा वाद झाल्याचे पाहण्यास मिळाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत हे पोलिसांवर प्रचंड चिडले.
पक्षाचे पदाधिकारी आकाश सोनवणे यांना मतदानचे काही तास बाकी असतानाच वरळी पोलिसांनी तडीपारची नोटीस दिली. कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी ही कारवाई केलीच कशी असे म्हणत खासदार सावंत यांनी पोलिसांना उलट प्रश्न केला.
शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली. दरम्यान, नोटीस बजावणाऱ्या पोलिसाने डीएसपी साहेबांनी नोटीस दिली असल्याचे सांगितले. त्यानंतर सावंत यांनी डीएसपींना फोन लावा, असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली.
अरविंद सावंत यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला फोन करत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, नेमका कोणता गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे तडीपार करण्यात येत आहे ते सांगा. आम्ही कायदे पाळणारे व्यक्ती आहोत. आम्ही सहकार्य करू पण गुन्हा कोणता दाखल झाला आहे याची माहिती द्या. नोटीसीवर तारीख देखील नाही. तुम्ही वाटेल तसे वागताय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.