Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घड्याळ हीच अजित पवारांची शेवटची ओळख ठरली !

पुणे : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह आहे. आतापर्यंतच्या बहुतांश सर्वच निवडणुका अजित पवार यांनी घड्याळ चिन्हावरतीच लढल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील अजित पवार सातत्याने घड्याळाचा आलाराम वाजवा घड्याळाला मतदान करा असं सांगताना पाहायला मिळाले.

त्यामुळे त्यांच्या पक्षाचे चिन्ह म्हणून घड्याळ हे त्यांची ओळख बनले होते आणि आज शेवटच्या क्षणीही त्यांनी हातात घातलेल्या घड्याळाने त्यांची ओळख पटवली असल्याचं सांगितलं जात आहे.

राजकीय जीवनात 'दादा' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे बारामतीतून अनेकदा निवडून आले होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे मोठे स्थान होते. हा अपघात बारामती विमानतळाजवळ सकाळी सुमारे ८.४५ वाजता घडला, जेव्हा ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) प्रमुख अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीजवळील विमान अपघातात दुःखद निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर्ड विमानाचे लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटल्याने ते शेतात कोसळले आणि भीषण आग लागली. या अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर सर्व ५ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने दिली आहे.

अपघात इतका भीषण होता की विमान पूर्णपणे जळून खाक झाले आणि मृतदेह ओळखणे अत्यंत कठीण झाले होते. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळामुळे त्यांची ओळख पटली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह आहे. आतापर्यंतच्या बहुतांश सर्वच निवडणुका अजित पवार यांनी घड्याळ चिन्हावरतीच लढल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील अजित पवार सातत्याने घड्याळाचा आलाराम वाजवा घड्याळाला मतदान करा असं सांगताना पाहायला मिळाले.

त्यामुळे त्यांच्या पक्षाचे चिन्ह म्हणून घड्याळ हे त्यांची ओळख बनले होते आणि आज शेवटच्या क्षणीही त्यांनी हातात घातलेल्या घड्याळाने त्यांची ओळख पटवली असल्याचं सांगितलं जात आहे.

राजकीय जीवनात 'दादा' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे बारामतीतून अनेकदा निवडून आले होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे मोठे स्थान होते. हा अपघात बारामती विमानतळाजवळ सकाळी सुमारे ८.४५ वाजता घडला, जेव्हा ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.