अश्रूचा बांध फुटला!
सुनेत्रा पवार हात जोडून सुन्न अवस्थेत फडणवीस आणि शिंदेंनी घेतली भेट
बारामती : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. बारामतीमध्ये सभेसाठी येत असताना अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरुन बारामतीला येत होते. अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील सहभाग घेतला होता. यानंतर सभांसाठी ते बारामतीमध्ये येणार होते.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या या सभा व बैठका होणार होत्या. यामुळे आपली सर्व कामे उरकून अजित पवार हे सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून निघाले. बारामतीत लँडिंगवेळी, 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. विमानाचा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचा मृत्यू झाला आहे. आता धक्कादायक मृत्युनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीमध्ये पोहचले असुन अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.