Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तरुणाला अंगावर वळ उमटेपर्यंत बदडले; दोन पोलीस निलंबित!

तरुणाला अंगावर वळ उमटेपर्यंत बदडले; दोन पोलीस निलंबित!

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

लाइट फिटिंगचे काम आटोपून घरी परतणाऱ्या तरुणाला त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे सांगत पोलिसांनीच जबर मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी (ता. २१) रात्री घडला. अक्षय ज्ञानेश्वर ठोकळ (वय ३२, रा. मुकुंदवाडी) असे मारहाणीत जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत मुकुंदवाडी ठाण्यात दोन पोलिसांवर गुन्हा नोंद झाला.

दरम्यान, मारझोड करणाऱ्या पोलिस अंमलदार गणेश वाघ आणि संतोष बिरारे या दोघांनाही शुक्रवारी निलंबित करण्यात आल्याचे ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले. मुकुंदवाडीतील अक्षय ठोकळ हा बुधवारी रात्री साडेबाराला मित्र भाऊसाहेब मोरे याच्यासह टीव्ही सेंटर येथून लाइट फिटिंगचे काम आटोपून मुकुंदवाडी स्टॉपवर आले. दरम्यान, येथील पान सेंटरवर मित्र शुभम याच्या दुचाकीवर गेले. तेव्हा तेथे पोलिस कर्मचारी वाघ व बिरारे आले. तुमच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे ते म्हणाले.

तेव्हा ही दुचाकी बुलडाणा पासिंगची असली तरी मित्र शुभम जाधव याची असून, कागदपत्रे दाखवितो, असे सांगितले. दोघांनीही काही न ऐकता हातातील लाठीने मारहाण करण्यास सुरवात केली. पोटात, छातीत, लाथा-बुक्क्या मारून शिवीगाळ केली.

सहकारी भाऊसाहेबलाही मारहाण केली. यानंतर भाऊसाहेब घाबरून पळून गेला. त्याचा भाऊ तुषार याला घेऊन तो परत आला. तुषारने दोघांना घरी पाठवले. पोलिसांकडील दुचाकीची चावी घेऊन तो घरी आला. या प्रकाराबाबत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.