दिल्लीत अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा राडा
ED च्या छाप्याविरोधात TMC चा मोर्चा
नवी दिल्ली : खरा पंचनामा
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कोलकत्ता येथील छापेमारीविरोधात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीत मोर्चा उघडला. टीएमसीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयासमोर विरोध प्रदर्शन केले.
दिल्ली पोलिसांनी टीएमसीच्या खासदारांना ताब्यात घेतले. तर खासदार महुआ मोईत्रा यांनी ईडीच्या छापेवारीवरच शंका उपस्थित केली. पक्षाविरोधात षडयंत्र रचल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा सर्व प्रकार चुकाची असल्याचे त्या म्हणाल्या. तर या प्रकारामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कुणापुढे झुकणार नसल्याचा इशारही त्यांनी भाजपला दिला. केंद्रीय गृहमंत्रालय ईडीचा कसा गैरवापर करत आहे हे संपूर्ण भारताने आणि पश्चिम बंगालने पाहिले. ईडीला आपच्या पक्षाचा अजेंडा, राजकीय आणि रणनीती चोरण्यासाठी भाजपने पाठवल्याचा मोठा आरोप त्यांनी केला. तर ममता बॅनर्जी या शेरणी आहेत, त्यांनी आमच्या पक्षाची वैचारिक संपत्ती जपून ठेवल्याचा दावा मोईत्रा यांनी केला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी भाजप आणि टीएमसीमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या विरोध प्रदर्शनावेळी खासदार डेरेक ओ ब्रायन आणि महुआ मोईत्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर कार्यकर्त्यांना पोलिसांनी हटवले. TMC खासदार कीर्ति आझाद यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. भाजपने गेल्या 11 वर्षात निविदा प्रक्रिया राबवली नाही. आपल्याच लोकांना कामं दिली आणि तिजोरीला लुटल्याचा आरोप त्यांनी केला.
कोळसा चोरी प्रकरणात मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने गुरुवारी आय-पीएसीच्या कोलकत्ता येथील कार्यालय आणि संचालक प्रतिक यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी अशांतता आणि भीतीचे वातावरण तयार करण्यात येत असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.