Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपाकडून मोठी कारवाई! मुंबईत 26 तर सोलापुरात माजी महापौरांसह 28 जणांना पक्षातून हाकललं

महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपाकडून मोठी कारवाई! 
मुंबईत 26 तर सोलापुरात माजी महापौरांसह 28 जणांना पक्षातून हाकललं

मुंबई : खरा पंचनामा

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने प्रचारांचा धुरळा उडत आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांना बंडखोरीचा सामनाही करावा लागत आहेत. भाजपाकडून अशा बंडखोर नेते, कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे. मुंबईत कारवाई केल्यानंतर आता भाजपाने सोलापुरात बंडखोर 28 कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये माजी उपमहापौर, 4 माजी नगरसेवकांसह 28 जणांचा समावेश आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणं पदाधिकाऱ्यांना भोवलं आहे. माजी उपमहापौर, 4 माजी नगरसेवकांसह 28 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात लढणाऱ्यांवर पक्षाकडून कडक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांनी दिली आहे.

पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका तसंच अपक्ष व इतर पक्षांच्या चिन्हावर उमेदवारी घेतल्याने या सर्वांचं निलंबन झालं आहे. भाजपचे 102 अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर बंडखोरी व पक्षविरोधी भूमिका सहन केली जाणार नसल्याचा इशारा बंडखोरांना देण्यात आला होता. मात्र अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी कायम ठेवल्याने अखेर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत महापालिका निवडणुकीची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. भाजपाकडून संपूर्ण राज्यभरात जोरदार प्रचार सुरु आहे. यादरम्यान भाजपाने पक्षांतर्गत मोठी कारवाई केली आहे.

भाजपाने 26 जणांना पक्षातून हाकललं आहे. तब्बल सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. दादर पक्ष कार्यालयातील बैठकीनंतर निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार कारवाई झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

भाजपाकडून मुंबईत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत मुंबई भाजपकडून 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. दादर पक्ष कार्यालयातील बैठकीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार कारवाई झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.