Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा

मुंबई : खरा पंचनामा

२०१९ आधीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (' एचएसआरपी') नंबर नसलेल्या वाहनधारकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने नवी मुदतवाढ दिली नसली तरी 'एचएसआरपी' नसलेल्या वाहनधारकांवर तूर्त कारवाई होणार नाही. दरम्यान, विद्यमान कंत्राटदारांची मुदत संपल्याने जुन्या गाड्यांना 'एचएसआरपी' लावण्यासाठी नवा कंत्राटदार शोधण्यासाठी परिवहन आयुक्तालय पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्याचे नियोजन करीत आहे.

राज्यातील ५६ प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' लावण्यासाठी तीन मंडळांत विभागणी केली आहे. यासाठी रोजमार्टा सेफ्टी सिस्टिम, रियल मेजॉन इंडिया आणि एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स अशा तीन अधिकृत एजन्सींची नियुक्ती केली होती. त्यांच्या कंत्राटाची मुदत संपली आहे. यामुळे नव्याने एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांची राज्यातील संख्या सुमारे दोन कोटी दहा लाख इतकी आहे. यातील ९७ लाख वाहनांची 'एचएसआरपी' साठी नोंदणी झाली असून, त्यातील सुमारे ७५ लाख वाहनांना 'एचएसआरपी' लागली आहे. दरम्यान, 'एचएसआरपी' साठी ऑनलाइन बुकिंग घेतलेल्या वाहनधारकांना नियोजित तारखेपर्यंत फिटमेंट संबंधित केंद्रावर जाऊन 'एचएसआरपी' बसवता येईल.

'एचएसआरपी' नसलेल्या वाहनांवर कारवाईबाबत तूर्त निर्णय झालेला नाही. ऑनलाइन बुकिंग घेतलेल्या जुन्या वाहनधारकांनी नियोजित तारीख आणि वेळेवर संबंधित फिटमेंट केंद्रावर जाऊन 'एचएसआरपी' बसवून घ्यावी, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना उच्च-सुरक्षा नंबर प्लेट असणे आवश्यक आहे. राज्यात अशा २.४३ कोटी वाहने आहेत. जुन्या वाहनांवर उच्च-सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया ३१ मार्चपासून सुरू झाली. आतापर्यंत ४.७२३ दशलक्ष वाहनांना उच्च-सुरक्षा नंबर प्लेट मिळाल्या आहेत. ८.७१५ दशलक्ष वाहनांची नोंदणी झाली आहे. तथापि, अंदाजे १.८ कोटी वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांची नोंदणी केलेली नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.