Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खेडमध्ये 12.33 लाखांची 83 किलो वजनाची अफूची झाडे जप्त धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई

खेडमध्ये 12.33 लाखांची 83 किलो वजनाची अफूची झाडे जप्त 
धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई

धाराशिव : खरा पंचनामा 

धाराशिव तालुक्यातील खेड येथे छापा टाकून शेतात लावलेली अफूची 83 किलोची झाडे जप्त करण्यात आली. यामध्ये एकूण 12.33 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

धाराशिव तालुक्यातील खेड येथे शेतात अफूची लागवड केल्याची माहिती टास्क फोर्सच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यांनी त्यांच्या पथकासह स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन शेतात छापा टाकला. त्यावेळी शेतात ठिकठिकाणी अफूची झाडे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली. त्याचे वजन 83 किलो भरले. बाजारभावानुसार त्याची किंमत 12.33 लाख रुपये होते. ती झाडे जप्त करून ढोकी पोलीस ठाण्यात  लिंबराज पाडुरंग लोमटे, रामहारी नामदेव लोमटे, नरहरी गोंविद लोमटे, ज्ञानेश्वर वसुदेव टकले (सर्व रा. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक दिपाली पाटील, वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार शैला टेळे, सुरेश राउत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, कैलास गाडेकर, नितीन जाधव, रविद्र साळवे, सुरज जोनवाल, ज्ञानेश्वर चव्हाण, हरीचंद्र मुंढे, अमितसिंग ठाकुर, अतुल तुपे, आम्रपाली सुर्यवंशी, ज्योती किर्तीकर, प्रियंका पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.