Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आता थेट नागरिकांपर्यंत जाणार!भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तालुकानिहाय दौरे : पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आता थेट नागरिकांपर्यंत जाणार!
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तालुकानिहाय दौरे : पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार 

सांगली : खरा पंचनामा 

शासकीय नोकरांच्या भ्रष्टाचाराविषयी तक्रार करावयाची असेल तर त्यांना सांगलीला यावे लागते. हे टाळण्यासाठी व लोकांशी थेट संपर्क व्हावा, यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी ) लोकांपर्यंत जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी या विभागाच्या अधिकाऱ्यांचे दौरे निश्चित करण्यात आले आहेत. नागरिकांनी तेथे जाऊन थेट आपल्या तक्रारी दाव्यात असे आवाहन सांगली एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी केले आहे.

एसीबीचे अधिकारी सांगली जिल्हयातील प्रत्येक तालूक्यात जाणार आहेत. तेथील शासकीय विश्रामगृहात सकाळी ११.०० वा. ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. उपाधीक्षक इनामदार म्हणाल्या, अनेकदा लोकांना शंका असते की आपण तक्रार दिली तर, आपले काम होणार नाही. आपली अडवणूक केली जाईल. आमचे अधिकारी लोकांच्या शंकाचे निरसन करतील. या लोकसंवादाची प्रसिध्दी प्रत्येक तालुक्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी हँडबिले, स्टिकर तयार करण्यात आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे काम कसे चालते याची माहिती आमचे अधिकारी लोकांना देतील. तसेच आलेल्या लोकांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल.

एसीबीचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे ठिकाण, वार व दिनांक असे : 
शनिवार, दि. २१ फेब्रुवारी : आटपाडी
सोमवार, दि. २३ फेब्रुवारी : विटा
मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी : कवठेमहांकाळ 
बुधवार, दि. २५ फेब्रुवारी : मिरज 
गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी : तासगाव 
शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी : कडेगाव 
सोमवार, दि. ०२ मार्च : शिराळा 
मंगळवार, दि. ०३ मार्च : जत 
गुरुवार, दि. ०५ मार्च : इस्लामपूर
मंगळवार, दि. १० मार्च : पलूस

नागरीकांनी या वेळेत अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्याकडील माहिती / तक्रारी सादर करु शकतात, असे आवाहन उपाधीक्षक इनामदार यांनी केले आहे. तसेच नागरीकांनी त्यांच्या तक्रारी टोल फ्री नंबर १०६४, फोन क्रमांक. ०२३३-२३७३०९५ किंवा मोबाईल क्रमांक-९४० ४०४ १०६४ वर करावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.