Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जबरी चोरीचा गुन्हा आठ तासात उघड : एकाला अटक 2.70 लाखांचा मुद्देमाल जप्त : रहिमतपुर पोलीस ठाण्याची कामगिरी

जबरी चोरीचा गुन्हा आठ तासात उघड : एकाला अटक 
2.70 लाखांचा मुद्देमाल जप्त : रहिमतपुर पोलीस ठाण्याची कामगिरी

सातारा : खरा पंचनामा 

जिल्ह्यातील रहिमतपुर ते कोरेगांव रस्त्यावर लिफ्ट मागून दुधी येथे निर्जन स्थळी लाथा बुक्क्यानी मारहाण करून सोन्याची चेन लंपास करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2.70 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जप्त करण्यात आल्याची माहिती कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी दिली. गुन्हा घडल्यानंतर आठ तासात रहीमतपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

दि.21 फेब्रुवारी रोजी फिर्यादी अजय विठठल गाडे (वय 37, रा. वडूज रोड माळावर रहिमतपुर, ता. जि. सातारा) हे आपले दुचाकीवरुन रहिमतपुर ते कोरेगांव असे जात असताना रोडमध्ये एक अज्ञाताने त्यांना लिप्ट मागुन त्याचे सोबत कोरेगांव येथे गेला. दरम्यान अज्ञाताने ओळख वाढवुन कोरेगांव येथील काम झाल्यावर मला देखील रहिमतपुर येथे परत जायाचे आहे, आपण सोबत जावु यावर फिर्यादी यांनी होकार दिल्यावर कोरेगांव येथील काम आटपुन फिर्यादी व अज्ञात इसम कोरेगाव येथुन रहिमतपुर येथे येत असताना मौजे दुधी (ता. कोरेगाव) च्या हद्दीत रस्त्यावर पुलाचे काम चालु असणा-या निर्जन ठिकाणी लघुशंकेचे बहाण्याने गाडी थाबवुन लिप्ट मागनाऱ्या अज्ञाताने अचानक फिर्यादी यांना लाथाबुक्यानी मारहाण करुन जखमी केले व त्याचे गळ्यातील सुमारे 2. 70 लाखांची 16.9 ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन जबरी चोरी करून पळून गेला होता.

हा गंभीर गुन्हा उघड करणेबाबत कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी सदर गंभीर गुन्हाचा व अज्ञात आरोपीत याचा शोध घेणेबाबत सपोनि. विनोद नेवसे यांना आदेशीत केले होते. नेवसे यांच्या पथकातील महेश देशमुख यांनी तात्रीक विशलेषण व सी.सी.टी.व्ही फुटेज यांचे आधारे सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न् करुन त्याचा शोध घेऊन पकडले. कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्याची चैन जप्त करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केद्रे हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. वैशाली कड्डुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगांव राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपुर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सचिन माने, प्रविण बर्गे, सुशांत शिंदे, महेश देशमुख, दिपक देशमुख, तुषार काळंगे यांच्या पथकाने केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.