Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक 3.15 लाखांचा 7 किलो गांजा जप्त : एलसीबीची कारवाई

मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक 
3.15 लाखांचा 7 किलो गांजा जप्त : एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 3.15 लाखांचा 7 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. 

सोहेल लालुखान पठाण (वय २०), हुसेन बादशाहा सय्यद (वय २७, दोघेही रा. कैकाडी गल्ली, हिंदु धर्मशाळेच्या पाठीमागे, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते. पथक मिरजेत गस्त घालत असताना हद्दपार गुन्हेगार हुसेन सय्यद साथीदारासोबत गांजा विक्री करण्यासाठी म्हैसाळ रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा लावला.

सय्यद एकासोबत तेथे आल्यावर पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील प्लास्टिक पोत्याची तपासणी केल्यावर त्यात 7 किलो तयार गांजा सापडला. तो जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. पठाण हा हद्दपार गुन्हेगार सय्यद याचा मेहुणा आहे. त्यांना मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार, अमोल ऐदाळे, अतुल माने, आमसिध्द खोत, रणजीत जाधव, श्रीधर बागडी, सुमित सुर्यवंशी, रोहन घस्ते, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.