महिला जिल्हा सरकारी वकिलाला दहा हजारांची लाच घेताना अटक
ठाणे एसीबीची कारवाई
ठाणे : खरा पंचनामा
पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत होईल असा युक्तिवाद करण्यासाठी पन्नास हजारांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये लाच घेताना महिला अतिरिक्त सरकारी वकीलास रंगेहात पकडण्यात आले. ठाणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
ठाणे न्यायालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संध्या दिनकर बच्छाव असे त्या महिला वकीलाचे नाव आहे. तक्रादाराविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात त्याला मदत होईल असा युक्तिवाद करण्यासाठी वकील बच्छाव यांनी त्याच्याकडे पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याबाबत त्याने ठाणे एसीबीकडे तक्रार दिली होती.
त्याची पडताळणी केल्यावर बच्छाव यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचून पन्नास हजारमधील दहा हजारांचा लाचेचा पहिला हप्ता घेताना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.