Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईतून अवघ्या 36 तासांत 12 मुलं बेपत्ता; पालकांमध्ये भीतीचे वातावरण !

मुंबईतून अवघ्या 36 तासांत 12 मुलं बेपत्ता; पालकांमध्ये भीतीचे वातावरण !

मुंबई : खरा पंचनामा

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. गेल्या अवघ्या 36 तासांमध्ये शहराच्या विविध भागांतून 12 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली असून यामध्ये 8 मुलींचा समावेश आहे. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. यामागे मानवी तस्करी करणारी एखादी मोठी टोळी सक्रिय असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील 7 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या मुलांच्या अपहरणाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 137(2) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही पालकाला खंडणीसाठी फोन आलेला नाही. यामुळे ही मुले मजुरी किंवा तस्करीसाठी पळवली असावीत, असा संशय बळावला आहे.

मुंबईतील काही विशिष्ट भागांमध्ये बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. यात शिवाजी नगरमधून 4 मुले, साकीनाका परिसरातून 2 मुले आणि टॉप हिल भागातून 2 मुले बेपत्ताझाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय ओशिवरा, मानखुर्द, बांगूर नगर आणि घाटकोपर या ठिकाणांहून देखील प्रत्येकी 1 मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाले आहे.

मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. रेल्वे स्थानके, बस डेपो, रुग्णालये आणि गर्दीच्या बाजारपेठांमध्ये बेपत्ता मुलांचे फोटो लावण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने पोलीस संशयितांचा माग काढत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.