Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरट्यांचा धुमाकूळ....बारामतीत चोरटयांनी 25 लाखांचे दागिने केले लंपास

अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरट्यांचा धुमाकूळ....
बारामतीत चोरटयांनी 25 लाखांचे दागिने केले लंपास

बारामती : खरा पंचनामा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान चोरटयांनी किमान पंधरा जणांचे पंचवीस लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बारामतीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा चोरट्यांची धरपकड केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.

अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी 29 जानेवारी रोजी लाखाचा जनसमुदाय उपस्थित होता. या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत काही जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन व दागिने चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. या पैकी काही चोरटयांना नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर काहींना पोलिसांनी पकडले.

विशेष म्हणजे त्या दिवशी बारामतीत आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. ज्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर चोरट्यांच्या टोळीने हात साफ करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अक्षरशः हजारो पोलिस उपस्थित असतानाही धाडस दाखवित या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. बंदोबस्तात पोलिस असल्याचे पाहत चोरटयांनी पोलिसांसमोरच चो-यांचा प्रयत्न केल्याने लोक संतप्त झाले आहेत.

या प्रकरणी बारामती तालुका पोलिसात आठ ते दहा तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

या मध्ये राजकुमार बाबूराव आठवले (रा. गेवराई, जि. बीड), महम्मद अनिस महमद युनुस, येजाज भग्गू मिरावले, मोहमद सादिक मोहमद सिराज (सर्व रा. दिग्रस, जि. यवतमाळ), बाळू बबन बोत्रे (रा. पळसदेव, ता. इंदापूर) व त्याचे दोन मित्र अशा संशयितांविरुध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी रणजित बाबासाहेब जाधव व रमेश लालासाहेब वाबळे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान विजया गजानन पवार यांचे गंठण, नीलेश लक्ष्मण काटे, अशोक मोरे, मनोहर जाधव, विजय शिंदे, जालिंदर बसले, संजय काटे, विश्वजित तुपे, सतीश सातकर, अमोल ताटे, अंकुश दिघे, प्रशांत सपकळ, विकास भागवत यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी चोरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी या चोरट्यांकडे कसून तपास सुरु केला असून यातील सर्व सहभागी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे चंद्रशेखर यादव म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.