अंधारात निर्जन ठिकाणी बसणाऱ्या नशेखोरांवर कडक कारवाई
मिरज विभागात एका दिवसात 50 गुन्हे दाखल : उपधीक्षक गिल्डा
सांगली : खरा पंचनामा
अंधा-या व निर्मनुष्य ठिकाणी मोटारसायकलवरुन तसेच आवश्यकतेनुसार पायी गस्त करून दारु पिणारे, नशा करणाऱ्यांवर शनिवारी रात्री कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली. मिरज आणि कुपवाड शहरात एका दिवसात नशा करणाऱ्यांविरोधात तब्बल 50 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी दिली.
नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नशेखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उपाधीक्षक गिल्डा यांनी नशेखोरावर कारवाई करण्यासाठी मिरज शहरचे पोलीस निरीक्षक किरण चौगले, महात्मा गांधी चौकचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, कुपवाड एमआयडीसीचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांची पथके तयार केली होती.
मिरज विभागातील मिरज शहर परीसर व कुपवाड परीसरातील अंधा-या व निर्मनुष्य ठिकाणी पायी तसेच मोटारसायकलवरुन गस्त घालत दारु पिणारे, दारु पिण्याचे उद्देशाने थांबलेले, नशा करणारे तसेच अवैधरीत्या जुगार खेळणारे इसमांवर छापेमारी करुन मिरज शहर पोलीस ठाणेस ३०, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज येथे १६ व एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेस ४ असे एकूण ५० गुन्हे दाखल करुन अंधा-या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे, जुगार खेळणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.