सांगलीच्या तरुणाला सोने तस्करी प्रकरणी मुंबईत अटक
मुंबई : खरा पंचनामा
दुबईहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी १ कोटी ७७ लाख सोने तस्करीच्या प्रकरणी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रणव पाटील (२८) असे असून तो सांगलीचा रहिवासी आहे.
पाटील हा दुबईतून मुंबईसाठी निघाला त्यावेळी त्याने त्याच्याकडील सोने हे त्याच्या सीटखाली लपवले. त्याच्याकडे सोने असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांकडे होती. तो मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याला विमानातून हे सोने बाहेर कसे काढायचे हे न समजल्यामुळे तो सोन्याशिवाय विमानातून बाहेर पडला आणि विमानतळावरील ग्रीन चॅनलमधून बाहेर आला. तो तेथून बाहेर पडल्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला सोन्याबाबत विचारणा केली. सुरुवातीला त्याने नकार दिला. नंतर मात्र त्याने सोने सीट खाली लपविल्याची कबुली दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विमानात जाऊन त्याच्या सीटखालून हे सोने हस्तगत केले. प्रतीक नावाच्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून आपण हे सोने आणल्याची माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.