मुंबई महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडेंना उमेदवारी, शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौर पद
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई महापालिकेसाठी भाजप महापौर पदाची माळ कोणाच्या गळात टाकणार याची उत्सुकता होती. अखेर आज भाजपकडून महापौर पदाच्या उमेदवार म्हणून रितू तायडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
तर, उपमहापौर पद शिदेंच्या शिवसेनेला देण्यात येणार असून संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमदेवार असणार आहेत.
भाजप आणि शिदेंच्या शिवसेनेचे संख्याबळ पाहता रितू तायडे आणि संजय घाडी यांची निवड ही केवळ आता औपचारिकता राहिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील महापौर पदाची निवडणूक लढण्यात येणार आहे.
रितू तायडे या भाजपच्या जुन्या कार्यकर्ते असून त्यांना संघटनात्मक कामाचा अनुभव आहे. मुंबई महिला मोर्चात काम केले आहे. त्या माजी नगरसेविका असून महापालिका कामाकाजाचा अनुभव आहे. तर, शिदेंच्या शिवसेनेकडून संजय घाडी यांच्या विश्वास दाखवत घाडी यांना उपमहापौर पद देण्यात आले आहे. मात्र, घाडी हे केवळ सव्वा वर्षच उपमहापौर पदी असतील. शिंदेंच्या शिवसेनेकडून हा फॉर्म्युला राबण्यात येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या नगरसेवकांना देखील उपमहापौर पदी संधी मिळणार आहे.
मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वाधिक 89 नगरसेवक आहेत. तर, शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक विजयी नगरसेवक हा देखील महायुतीसोबत गेला आहे. तर, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 65 नगरसेवक आहेत. तसेच मनसेकडे सहा नगरसेवक आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ते कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता असणार आहे. विरोधी पक्षनेते म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.