Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"मुख्यमंत्री आमच्यासाठी कामधेनू"

"मुख्यमंत्री आमच्यासाठी कामधेनू"

बीड : खरा पंचनामा 

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख कामधेनू असा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परळी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने महा पशुधन एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.

या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री हे आमच्या आमच्यासाठी कामधेनू आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे यांनी स्वागत भाषणात मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांचं जोरदार कौतुक केलं.

देवाभाऊ आमच्या दृष्टीने तुम्हीच कामधेनू आहात... म्हणजे आमच्या इच्छा पूर्ण करणारे. परळी तीर्थक्षेत्र विकासासाठी अर्थ संकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करावी. परळीचा जिर्णोध्दार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्याला भरीव निधी द्यावा. सभागृहात दिलेला शब्द, थर्मल पॉवरच्या जागेवर सोलार प्रकल्प सुरू झाला आहे. देवाभाऊने यात पूर्ण लक्ष घातलं असून, तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू व्हावा तसेच पंचम द्वादश ज्योतिर्लिंग केंद्रीय प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा आणि प्रस्ताव तयार करण्यासाठी पाच कोटीचा निधी द्यावा. तसंच 11 पैकी नऊ प्रकल्पांमध्ये पाणी उपलब्धता आहे. तसं प्रमाणपत्र आहे. प्रकल्प पाण्याची व्यवस्था करावी. आपण जलसंपदा मंत्री आहात, ती मागणी पूर्ण करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

मुख्यमंत्री हे राज्यासाठी आणि आमच्यासाठी कामधेनू आहेत. आमच्या परळीच्या विकासासाठी जो काही निधी लागणार आहे तो ते देतीलच असे म्हणत वेगवेगळ्या कामांची यादी सादर करत निधी देण्याची मागणी केली. याबरोबरच भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्री हे कामधेनू आहेत त्यामुळे त्यांना आमच्या मनातील इच्छा माहित आहेत. त्यामुळे जास्त बोलत नाही असे म्हटल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.