Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस निरीक्षकाच्या रायटरने तब्बल 14 लाखांची लाच घेतली; रायटर निलंबित, निरीक्षकाची मुख्यालयात बदली

पोलिस निरीक्षकाच्या रायटरने तब्बल 14 लाखांची लाच घेतली; रायटर निलंबित, निरीक्षकाची मुख्यालयात बदली 

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

छत्रपती संभाजीनगरमधील एक व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. एक पोलीस कर्मचारी 14 लाखांची लाच घेताना व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे.

हा व्हिडिओ व्हायर झाल्यावर पोलिस खात्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. या प्रकरणी संबधीत पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

संभाजीनगरच्या लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनवर कारवाई करू नयेत यासाठी एका पोलीस निरिक्षकाने आपल्या रायटरच्या माध्यमातून लाच घेतल्याचा देखील दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती 14 लाख रुपये मोजून घेताना दिसत आहे, आणि हा व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाचेची रक्कम घेतली जात असल्याच्या दाव्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

तर, या सर्व घटनेवर पोलिसांची देखील प्रतिक्रिया आली आहे, व्हिडिओ दिसणाऱ्या पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आला आहे. तसेच ज्या पोलीस निरीक्षकावर आरोप करण्यात आले त्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.