Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणूक आयोगाचा कारवाईचा बडगा; अर्जुनसिंह मोहिते पाटलांवर गुन्हा

निवडणूक आयोगाचा कारवाईचा बडगा; अर्जुनसिंह मोहिते पाटलांवर गुन्हा

मुंबई : खरा पंचनामा

सोलापूर जिल्ह्यातील फोंडशिरस येथे मतदान करताना लहान मुलांना सोबत नेल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाईचाबडगाउगारला आहे. लहान मुलाला सोबत नेत मतदान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना ही निलंबित करण्यास निवडणूक आयोगाची मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे केंद्राध्यक्ष अण्णा बुद्धे आणि पोलिस कर्मचारी गजानन राऊत या दोघांना निलंबित करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी देण्यात आली आहे. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना त्यांच्या मुलाला पोलिंग बूथपर्यंत घेऊन जाण्यास परावृत्त न केल्याने शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यावर दाखल गुन्ह्याचे सध्यस्थितीचे अहवाल सादर करण्याच्या देखील सूचना आयोगाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

मतदानाच्या दिवशी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी, मतदानाचा अधिकार नसलेल्या त्यांच्या मुलानेच ईव्हीएमचे बटन दाबल्याचे व्हिडिओत दिसून आले. त्यावरुन, वाद निर्माण झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पोलिस कर्मचारी, मतदान केंद्राध्यक्ष यांची चूक आहे, असे सांगून संबंधित मतदार, पोलिस आणि केंद्राध्यक्षांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले गेलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शनिवारी दोन ते तीन ठिकाणी नियमांचे उल्लघंन झाल्याचे पुढे आले होतं. यात मोहोळमध्ये एका हॉटेलबाहेर ईव्हीएम आढळून आली आहेत. त्या प्रकरणी तिघांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. झोनल अधिकारी, त्यांचे सहायक आणि वाहनचालक यांची चूक असल्याचे दिसून आले आहे.

अशातचआता लहान मुलांना सोबत नेल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाईचाबडगाउगारला आहे. लहान मुलाला सोबत नेत मतदान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यातआला आहे. तर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.