Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"अनिकेत कोथळे हत्या'' प्रकरणाच्या अंतिम न्यायालयाीन युक्तीवादास गुरुवारपासुन सुरवात

"अनिकेत कोथळे हत्या'' प्रकरणाच्या अंतिम न्यायालयाीन युक्तीवादास गुरुवारपासुन सुरवात

सांगली : खरा पंचनामा 

सांगलीतील बहुचर्चित ""अनिकेत कोथळे हत्या'' प्रकरणातील न्यायालयीन सुनावणी दरम्यानच्या अंतिम युक्तीवादास गुरुवारपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश  एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयात ऍड. उज्ज्वल निकम सुरवात करणार आहेत. यापुर्वी प्राथमिक युक्तिवाद ऍड. निकम यांनी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातुन केलेला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख सुनिल रामानंद, (अपर पोलीस महासंचालक), तसेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची सुनावणी दरम्यान न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थिती असणार आहे.

ऍड. निकम यांनी सदर सुनावणी दरम्यान 35 साक्षीदार तपासले आहेत. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, न्यायदंडाधिकारी, शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी, डि.एन.ए तंज्ञ, मुख्य तपास अधिकारी अशा महत्त्वांच्या साक्षीदारांचा समावेश आहे. 

सदर गुन्हयाचे तात्कालीन मुख्य तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी अणि त्यांच्या पथकाने केलेल्या तपासाच्या आधारे ऍड. निकम यांनी गुन्हयातील आरोपींविरुध्दचे ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर केलेले आहेत. त्याच पुराव्याचे आधारे ऍड. निकम हे गुरुवारपासून दि. 28 फेब्रुवारी अखेर 3 दिवस सदर गुन्हयाचा अंतिम युक्तीवाद करणार आहेत. 

सुनावणी दरम्यान देखील मुख्य तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी प्रमोद नलावडे आणि जिल्हा सरकारी वकिल प्रमोद भोकरे हे देखील ऍड. निकम यांचे सोबत न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.