Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक सांगली शहर पोलिसांची कारवाई

देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक 
सांगली शहर पोलिसांची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी समोरील रस्त्यावर देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. 

आकाश सचिन शिंदे (वय २३, रा. ५० फुटी रोड, हामजा मस्जीद जवळ सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अरुण सुगावकर यांनी अवैधरित्या शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. पथक शहरात गस्त घालत असताना पथकातील संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप पाटील यांना एक तरुण आकाशवाणी समोरील रस्त्यावर पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.

पथकाने तेथे जाऊन शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. ते जप्त करून त्याला अटक करण्यात आली.

सांगली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर होळकर, संदिप पाटील, विनायक शिंदे, सतीश लिबळे, रफिक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे,  दिग्विजय साळुंखे, शंकर रणधीर, योगेश हाक्के, योगेश सटाले, गणेश कोळेकर, संदीप कोळी, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.