Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आदेश देतोय, सस्पेंड करा... मी नाही करणार ! मंत्री अन् महिला आयपीएसमध्ये बैठकीतच खडाजंगी

आदेश देतोय, सस्पेंड करा... मी नाही करणार ! 
मंत्री अन् महिला आयपीएसमध्ये बैठकीतच खडाजंगी

कैथल : खरा पंचनामा 

मंत्री अन् अधिकाऱ्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून सातत्याने खटके उडत असतात. मग तो विकासकामांचा मुद्दा असेल, अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा, बेकायदेशीर आदेश... अशा अनेक विषयांवरून भर बैठकांमध्ये वाद होत असतात.

एका पोलिस कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करण्याच्या मंत्र्यांच्या आदेशावरून IPS अधिकाऱ्यासोबत झालेल्या त्यांच्या खडाजंगीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडीओ हरियाणातील कैथल येथील आहे. हरियाणा सरकारमधील मंत्री अनिल विज आणि पोलीस अधिक्षक उपासना सिंह यांच्यात खडाजंगी झाल्याचे दिसते. यावेळी दोघांच्यामध्ये जिल्हाधिकारी अपराजिता बसलेल्या होत्या. दोघांमधील वाद पाहून त्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.

कैथलमध्ये शुक्रवारी जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये जमीन विक्री फसवणूक प्रकरणावर सुनावणी सुरू होती. या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप करण्यात आले होते. अनिल विज यांनी बैठकीतच संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. पण पोलीस अधिक्षक उपासना सिंह यांनी आपण निलंबित करू शकत नाही, असे सांगितले.

अधिक्षकांच्या उत्तरावरून वाद सुरू झाला. भडकलेल्या विज यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मी आदेश दिलेत, त्यानुसार सस्पेंड करा, असे विज म्हणाले. पण उपासना यांनी आपल्याला निलंबित करण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे आपण निलंबित करणार नाही, असे पुन्हा सांगितले. त्यावर विज यांनी अधिकार नसतील तर बैठकीतून निघून जा, असा संताप व्यक्त केला.

दोघांमधील वाद कमी होताना दिसत नव्हता. हे ओळकून जिल्हाधिकारी अपराजिता यांनी हस्तक्षेप केला आणि विज यांना उपासना यांचे म्हणणे समजावून सांगितले. त्या म्हणाल्या, पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे अधिकार नाही. त्या तुमच्या आदेशानुसार निलंबित करावे, असे वरिष्ठांना लेखी स्वरुपात कळतील, असे सांगितले. त्यानंतर मग हा वाद शांत झाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.