Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोस्टल रोडवरील प्रवास मनोरंजक होणार!देशातील पहिला 'म्यूझिकल रोड' मुंबईमध्ये; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते लोकार्पण

कोस्टल रोडवरील प्रवास मनोरंजक होणार!
देशातील पहिला 'म्यूझिकल रोड' मुंबईमध्ये; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते लोकार्पण

मुंबई : खरा पंचनामा

मुंबईतील सागरी किनारा मार्गावर एक अनोखा प्रकल्प सुरू होणार आहे. हा मार्ग देशातील सर्वात पहिला म्यूझिकल रोड बनणार आहे. यामुळे सागरी किनारा मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आता मनोरंजक होणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित या म्यूझिकल रोड प्रकल्पाचं लोकार्पण झालं.

मुंबई महापालिकेकडून हा प्रकल्प सुरु केला गेला असून, माजी खास राहुल शेवाळे यांची ही संकल्पना होती. या संपूर्ण सागरी किनारा मार्गावर महापालिकेने 'मेलडी रोड' पट्ट्या लावल्या आहेत. यावरून वाहने जाताच 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटातील 'जय हो' हे गाणं वाजणार आहे. हे पट्टे नरिमन पॉईंटच्या दिशेने वरळीकडे जाणाऱ्या उत्तरेकडील मार्गावर लावले आहेत. बोगद्यातून बाहरे पडताच 500 लांब या पट्ट्या बसवल्या आहेत. सध्या ही म्यूझिकल रोड ची सेवा फक्त 500 मीटरपर्यंत मर्यादीत आहे.

वाहत 70 ते 80 किमी प्रति तासाच्या वेगात या पट्ट्यांवरून जाताच वाहनाच्या हालचालीमुळे हे संगीत ऐकू येणार. महापालिकेनं म्यूझिक रोड च्या 500 मीटर, 100 मीटर आणि 60 मीटर अंतरावर यासंदर्भात सूचना फलक लावले आहेत. यामुळे वाहनचालकांना मार्ग सुरु होण्यापूर्वी कल्पना मिळेल. ही संकल्पना सर्वात पहिली जापानमध्ये वापरण्यात आली होती. 2007 मध्ये शिजुओ शिनोदा नावाच्या अभियंत्याला एका रस्त्यावर काम करताना हे जाणवलं. या प्रयोगाचं रुपांतर नंतर 'म्यूझिकल रोड'मध्ये झालं. त्यानंतर जपानमध्ये इतर ठिकाणी, हंगेरी, दक्षिण कोरिया आणि युएईमध्ये ही असे मार्ग सुरु करण्यात आले.

मुंबईतील सागरी किनारा मार्ग 10.8 किमी लांब असून वरळी ते मरिन ड्राईव्ह या ठिकाणांना जोडतो. हा संपूर्ण मार्ग 10 पदरी असून यामुळे मुंबईतील या भागांतील प्रवासाचा वेळ 70 टक्क्यांनी कमी झाला आहे. या संपूर्ण मार्गासाठी एकूण 13,983 कोटींचा खर्च झाला आहे. मार्च 2024 मध्ये या मार्गाचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. त्यानंतर ऑगस्ट 2025 पर्यंत हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.