Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रोहित पवारांच्या परिषदेनंतर DGCA थेट बारामतीतविमानतळाची बारीक तपासणी

रोहित पवारांच्या परिषदेनंतर DGCA थेट बारामतीत
विमानतळाची बारीक तपासणी

पुणे : खरा पंचनामा

बारामतीत ज्या ठिकाणी अजितदादांचा अपघात झाला त्याच ठिकाणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) च्या टीमने पाहणी केली. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा यांची सविस्तर तपासणी करण्यात आलीय.

विमानतळ सुरक्षित आहे का, याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अहवालावर अवलंबून राहणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकरच सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्याजवळील बारामती विमानतळावर विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या भीषण घटनेनंतर बारामती विमानतळाची सुरक्षा, तिथल्या अपुऱ्या सोयीसुविधा आणि तांत्रिक त्रुटींवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजकारण्यांची सातत्याने वर्दळ असलेल्या या विमानतळाकडे सुरक्षिततेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विमानतळ कार्यपद्धती, विमानतळ पायाभूत सुविधा, सुरक्षा व आपत्कालीन प्रतिसाद सज्जता, नियमांचे पालन, फ्लाइंग ट्रेनिंग संचालन, एअरफिल्ड वापर पद्धती याची तपासणी करण्यात आली.

अजित पवारांच्या अपघातानंतर 13 दिवस उलटले तरी सरकारनं सखोल चौकशी का सुरू केली नाही? आणि सर्वात मोठा प्रश्न सीआयडीला विमान अपघाताचा तपास करण्याचा अधिकार आहे का? हे सगळं एकत्र जोडत रोहीत पवार यांनी एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला की अजित दादांचा केवळ अपघात नव्हता, तर तो एक नियोजित कट होता. आत सख्खा पुतण्या रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.