'विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काढला पळ...'?
जमीन मोजणी अन् महिला संतप्त
मुंबई : खरा पंचनामा
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ते अगतिक दिसत असून एक महिला आणि काही लोक त्यांच्यावर संतप्त झालेले दिसत आहेत. जमिनी मोजणी वेळेचा हा व्हिडिओ आहे. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
घरमालक घरात नसताना जमीन मोजणी केली जात होती. त्यानंतर त्या घरमालकाने आणि त्यांचे पत्नीने संतप्त होतं. मोजणी करणाऱ्यांना जाब विचारत त्यांना तेथून जाण्यास भाग पाडले. जमीन मोजणी करणाऱ्यांसोबत राहुल नार्वेकर हे देखील होते.
हा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर करत विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू? असे ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींना टॅग केले आहे.
काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे की, स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते. स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.