Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाच प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत, सकाळपासून नॉट रिचेबल !

लाच प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत, सकाळपासून नॉट रिचेबल !

मुंबई : खरा पंचनामा 

मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात 35 हजारांची लाच घेताना लिपीकाला एसबीने रंगहात पकडले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मंत्र्याच्या दालनात हे प्रकरण घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंत्री झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंधन सल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांचा फोन आज सकाळपासून नॉटरिचेबल आहे.

लाच प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून तपासामध्ये अटक केलेल्या लिपीकाने मंत्री झिरवळांच्या खाजगी पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचे कबुली दिल्याची माहिती आहे. त्यामुळे झिरवळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसबीने अटक केलेल्या अन्न व औषध प्रशानातील कर्मचाऱ्याचे नाव राजेंद्र ढेरंगे असे आहे. तो क्लार्क पदावर कार्यरत आहे. एका मेडिकलचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी त्याने 50 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील 35 हजाराची लाच घेताना तो रंगेहात सापडला.

मंत्री नरहरी झिरवळ यांनी काल (शुक्रवारी) माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही. जर आपला संबंध यामध्ये असल्याचे सिद्ध झाले तर आपण राजीनामा देऊ. दरम्यान, या प्रकरणात आता झिरवळाच्या खासगी सचिवाचे नाव पुढे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.