अजितदादांचे स्वप्न पूर्ण... पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
पुणे : खरा पंचनामा
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजित पवारांच्या स्वप्नाला साकार करत एकहाती सत्ता मिळवली आहे. जिल्ह्यातील एकूण ७३ जागांपैकी राष्ट्रवादीने तब्बल ४३ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे पुण्यात अजितदादांचे गड कायम राहिला आहे, तर विरोधक पक्षांना सत्तांतरण करण्याची संधी मिळाली नाही.
यंदाच्या निवडणुकीत भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेनेला ५, उद्धव सेनेला ७ आणि शरद पवार पक्षाला १ जागा मिळाल्या. २०१७ च्या निवडणुकीशी तुलना करता, राष्ट्रवादीने ७५ गटांपैकी ४४ जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळवली होती. शिवसेनेला १३ जागा, भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी ७ जागा मिळाल्या होत्या, तर अपक्ष आणि इतर पक्षांना मिळून ४ जागांवर यश मिळाले होते. बारामतीत झालेल्या या निवडणुकीत अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. कोणत्याही पक्षाकडून प्रचार करण्यात आला नाही आणि मतदारांमध्ये शांत, परंतु सजग वृत्ती दिसून आली. विशेष म्हणजे अजितदादांच्या बारामतीत मतदानाचा वेग इतर भागांच्या तुलनेत संथ होता.
या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार रिंगणात होते. तसेच पंचायत समित्यांच्या १४६ गणांसाठी ५२८ उमेदवारांनी आपले आव्हान मांडले होते. सर्व गणिते आणि निकाल पाहता राष्ट्रवादीने ४३ जागांवर प्रचंड बहुमत मिळवून अजितदादांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
राष्ट्रवादीचे हे वर्चस्व फक्त पुणे शहरापुरते मर्यादित राहिले नाही. मावळ भागातही पक्षाने भाजपच्या जागा खेचून आणत एकहाती सत्ता मिळवली आहे. यामागचे कारण म्हणून अजितदादांच्या काळात झालेल्या विकासकामांचा मतदारांवर सकारात्मक परिणाम मानला जात आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण कसे घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत राज्यातील त्यांच्या प्रभावाचे दर्शन घडवले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.