Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस ठाण्याच्या कोठडीतून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पसार, तीन तासात पकडला

पोलीस ठाण्याच्या कोठडीतून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पसार, तीन तासात पकडला

पुणे : खरा पंचनामा

येरवडा पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीतून (लॉकअप) पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. लॉकअपमधील स्वच्छतागृहातील काचा उचकटून आरोपी पसार झाला. पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार आरोपीला येरवड्यातून अटक केली.

शैलेश राजू मोहिते (वय १९, रा. कामराजनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहिते याला अल्पवयीन युवतीवर बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करुन त्याला ५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. रविवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोहितेने कोठडीत अंथरण्यासाठी चादर हवी आहे, असा बहाणा केला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष चुकवून तो स्वच्छतागृहात केला. स्वच्छतागृहातील खिडकीच्या काचा सरकवून उतरला आणि पसार झाला. काही वेळानंतर मोहिते पसार झाल्यााचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मोहिते याला येरवडा परिसरातून रात्री दहाच्या सुमारास अटक केली. पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.