भाजपातर्फे हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगलीतील काँग्रेस भवनसमोर आंदोलन
सांगली : खरा पंचनामा
भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्यातर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगलीतील काँग्रेस भवनसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करत हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर टिपू सुलतान यांची तुलना केल्याने मोठा वाद निर्माण झाला. सपकाळ यांच्या विधाना विरोधात भाजपाकडून सांगलीत आंदोलन करत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावं, हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पांडुरंग कोरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव ज्योती कांबळे, जिल्हा सरचिटणीस विशाल पवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शांतिनाथ कर्वे, विश्वजीत पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडिलकर, श्रीकांत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष हेमलता मोरे, श्रीकांत वाघमोडे, जिल्हा सचिव उदय मुळे, नगरसेवक मोहन वाटवे, संजय यमगर, उदय बेलवलकर, दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र सदामते, अतुल माने, वैशाली गवळी, मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे, अमित देसाई, कृष्णा राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.