Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या संजय राऊतांच्या व्याह्यांचाही समावेश

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 
संजय राऊतांच्या व्याह्यांचाही समावेश 

मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. नव्या महायुती सरकारने याआधीदेखील प्रशासकीय पातळीवर फेरबदल केले होते. त्यानंतर आता पुन्हा नवे फेरबदल करण्यात आले आहेत.

राज्यातील बड्या IAS स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहेत. शुक्रवारी राज्यातील दोन ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यापासून गेल्या वर्षभरात बदल्यांचा धडाका सुरू आहे. प्रत्येक १०-१५ दिवसाला सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. बदल्यांच्या धडाक्याची परंपरा या आठवड्यात देखील अबाधित आहे.

राजेश नार्वेकर (IAS:SCS: 2009 ) यांची मुंबई येथील परिवहन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
समीर कुरतकोटी (IAS:SCS:2013) 
यांची मुंबई येथील शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेश नार्वेकर हे सनदी अधिकारी तसेत संजय राऊत यांचे व्याही आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. तसेच रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. या दरम्यान ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास या योजना प्रभावीपणे राबवणारे अधिकारी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. २०१८ मध्ये राजेश नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.