Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यात महायुतीची जोरदार मुसंडीभाजप पहिल्या तर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

राज्यात महायुतीची जोरदार मुसंडी
भाजप पहिल्या तर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई : खरा पंचनामा

आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल येत आहेत. एकूण 12 जिल्हा परिषदांसाठी शनिवारी मतदान झालं होतं. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजी नगर, सांगली, रायगड, लातूर, रत्नागिरी, धाराशिव, परभणी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक झालेली.

12 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 461 जागांसाठी निवडणूक झाली. सध्या मतमोजणीचा जो कल आहे, त्यानुसार भाजप 7, एकनाथ शिंदे शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचा पक्ष 1 जिल्हा परिषदेमध्ये आघाडीवर आहे. काँग्रेस दोन जिल्हा परिषदांमध्ये आघाडीवर आहे. यात कोल्हापूर आणि दुसरा लातूर आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाला खातही उघडता आलेलं नाही.

नगर परिषद, महापालिकांप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीतही महायुती सुसाट आहे. भाजप नंबर एकचा पक्ष ठरताना दिसतोय. त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या स्थानी आहे. महाविकास आघाडीत फक्त काँग्रेसचं अस्तित्व दिसतय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट अपयशी ठरला आहे.

12 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 461 जागांसाठी निवडणूक झाली. दुपारी 12.40 पर्यंत जे निकाल आलेत, त्यानुसार भाजप 170 जागांवर, एकनाथ शिंदे शिवसेना 98 जागी, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट 92 जागी आघाडीवर आहे. काँग्रेस 37, उद्धव ठाकरे शिवसेना 24, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 16 आणि इतर 24 जागांवर आघाडीवर आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत 68 पैकी 19 जागांचे अधिकृत निकाल आले आहेत. सर्वाधिक 6 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी 4 जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 3 जागा आणि जनसुराज्यनेही दोन जागांवर विजय मिळाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.