Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आपच्या बड्या नेत्याची गुरूद्वारासमोर धाडधाड गोळ्या झाडून हत्या

आपच्या बड्या नेत्याची गुरूद्वारासमोर धाडधाड गोळ्या झाडून हत्या 

जालंधर : खरा पंचनामा

पंजाबमध्ये राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. जालंधरमधील गुरुद्वाराबाहेर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी आम आदमी पक्षाचे नेते लकी ओबेरॉय यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओबेरॉय हे गुरुद्वाराबाहेर त्यांची कार पार्क करत असताना काही हल्लेखोर दुचाकीवरून तिथे आले. ओबेरॉय हे कारमध्ये असतानाच हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या गोळीबारात ओबेरॉय गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. दिवसाढवळ्या एखाद्या नेत्याची हत्या होणं ही गंभीर बाब असून जर नेतेचं सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान या घटनेने राजकारणात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.