Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लकी ड्रॉमध्ये कार जिंकणं महागात पडलं, सहायक धर्मादाय आयुक्तांचं निलंबन

लकी ड्रॉमध्ये कार जिंकणं महागात पडलं, सहायक धर्मादाय आयुक्तांचं निलंबन

गोंदिया : खरा पंचनामा 

खाजगी ज्वेलर्स द्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका लकी ड्रॉ सोडतीत महिंद्र एक्स यू वी 700 हे वाहन जिंकणे गोंदिया जिल्ह्यातील परिविक्षाधीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती दिशा केशवराव पजई यांना भोवले आहे. त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. राज्यशासनाच्या विधी आणि न्याय विभागातर्फे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खाजगी ज्वेलर्सद्वारे आयोजित लकी ड्रॉ मध्ये महागडे वाहन जिंकणे परिविक्षाधीन सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी त्यांचे थेट निलंबन करण्यात आले आहे. गोंदिया येथे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. श्रीमती दिशा केशवराव पजई यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

पूर्वपरवानगी न घेता, एका खाजगी ज्वेलर्स द्वारे आयोजित लकी ड्रॉ मध्ये चार चाकी वाहन मिळवून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाचा भंग केल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली असून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना अनुमती शिवाय गोंदिया मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

निलंबनाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा धंदा करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा धंदा केल्यास त्यांना गैरवर्तणूकीसाठी दोषी समजण्यात येऊन उचित कार्यवाही करण्यात येईल. तसेच अशा बाबतीत निर्वाह भत्त्यावर त्यांचा हक्क राहणार नाही, असे देखील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.